Best Marathi Poem on Corona, Marathi Poetry | कोरोना मराठी कविता


Corona is a contagious disease. The changes caused by the corona in the whole world and mainly in humans are explained in this poem.  In below you get an amazing Marathi poems on Corona Virus, Marathi Poetry. I hope you like our Marathi poem and share with your friends. कोरोना या कवितेमध्ये मी मानवामध्ये कोरोनामुळे झालेले बदल हे मोजक्याच शब्दांत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आशा आहे तुम्हा सगळ्यांना नक्की आवडेल…


कोरोना - Corona Poem in Marathi | कोरोना मराठी कविता


कधी सरणार रान , किती मरती अजुन
एका आजाराने माणूस कसा आलाय शरण

विसरले सुख दुःख , लोक विसरले भांडण
माणसातून कसे गेले माणुसकीचे कोंदण

आपल्या घरातच आपण कसे झालो नजरकैद
नाही लगीन सराई ना साजरे होई सण

कसे जगावे आता प्रश्न पडला गहण
झाले महाग जीवन स्वस्त झाले हे मरण

काय करायचा पैसा काय कामाची श्रीमंती
एका कोरोनाने केले कसे गर्वाचे हरण

बंद झाले खेडे गाव बंद झाले हे शहर
एका कोरोनाला कसे जग आले हे शरण

- केशव कुंभार





Written by Keshav Kumbhar

No comments