Best Marathi Poem on My Daughter, Marathi Daughter Poetry | माझी लेक मराठी कविता


Daughter is god's best gift for every parents . Daughter is a symbol of unconditional love and care. In below you get an amazing Marathi poems on Daughter, Marathi Poetry. I hope you like our Marathi poem and share with your friends. माझी लेक या कवितेमध्ये मी माझ्या लाडक्या मुलीचे वर्णन हे मोजक्याच शब्दांत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आशा आहे तुम्हा सगळ्यांना नक्की आवडेल…


माझी लेक - My Daughter Poem in Marathi | माझी लेक मराठी कविता


माझ्या घरी आली एक सोन्याची बाहुली
जणू देव भेटला मला देवाच्या राऊळी

माझी लेक आली जेव्हा माझ्या घराच्या उंबरी
आली लक्ष्मी माझ्या घरी सोनियाच्या पाऊली

मन आले गहिवरून तिने दिले बाप पण
तिच्यामुळे बाप झालो, झालो मायेची माऊली

गेला अहंकार दूर, गेलो सारे दुःख विसरून
माझ्या लेकीमध्ये दिसली मजला आईची सावली

माझ्या लेकीचा घरात कसा गुंजतो वावर
इवल्याशा पायांनी घेती पाऊले इवली

माझ्या लेकीचे हसणे साऱ्या घराचे फुलणे
आजी आईची लाडकी अन् दादाची छकुली

- केशव कुंभार





Written by Keshav Kumbhar

No comments