Poems on Memories in Marathi , Best Marathi Poetry | आठवण मराठी कविता
Some memories are unforgettable. It is the timeless treasures of the heart. In below you get an amazing Poem on Memories in Marathi, Memories Poetry for your loved once. I hope you like our Poem on Memories in Marathi, Memories Poetry and share with your friends. 'कवितेच्या एका कडव्यात' या कवितेत मी कवियित्रीच्या मनातील भावनांना उजाळा दिला आहे. तसेच तिच्या मनात असलेल्या प्रिय व्यक्तीच्या आठवणींबद्दल व्यक्त केले आहे . आशा आहे तुम्हा सगळ्यांना नक्की आवडेल ...
Best Memories Poem in Marathi | आठवण मराठी कविता
कवितेच्या एका कडव्यात
शब्द - शब्द मी गुंफत होते
आठवणींना ओंजळीत धरून
भावनांना मी कुरवाळत होते
कवितेच्या एका कडव्यात
तुलाच मी आठवत होते
डोळ्यांत साठवून तुला
अश्रूंना मी पुसत होते
कवितेच्या एका कडव्यात
स्वप्नांतही तुलाच शोधत होते
शोधता शोधता तुला मी
माझेच अस्तित्व हरवत होते
कवितेच्या एका कडव्यात
माझेच दुःख मांडत होते
नशिबाचा हा खेळ बघून
स्वतःवरच मी हसत होते
- प्रियांका कुंभार
Written by Priyanka Kumbhar
8 comments
Nice poem 👌.
खुप मार्मिक कविता आहे. खुप छान
Khup chhan kavita ahe
Khup chhan kavita ahe
Khup chhan kavita ahe
Thank you for your valuable response!!
प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक धन्यवाद!!
मनःपूर्वक धन्यवाद!!
Post a Comment