Marathi Essay on Science Boon or Curse, Science Boon or Curse Information in Marathi | विज्ञान शाप की वरदान मराठी निबंध लेखन

Marathi essay writing topics for school students, essay topics for class 10. I hope you’ll like this articles related to essay in Marathi on Vidnyan Shap ki Vardan. मराठी निबंध लेखन हे विद्यार्थ्यांसाठी तसेच इतर सर्वांसाठी अतिशय उपयुक्त आहे. आशा आहे तुम्हा सगळ्यांना नक्की आवडेल…


विज्ञान - शाप की वरदान ?


एकविसावे शतक हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे युग आहे. आपले रोजचे आयुष्य तंत्रज्ञान आणि प्रसार माध्यमांनी पूर्णतः व्यापून गेले आहे. मानवाला अंधश्रद्धा आणि आज्ञापासून दूर करून ज्ञानाच्या प्रकाशमय जीवनात आणण्याचे सामर्थ्य विज्ञानामुळे शक्य झाले आहे. विज्ञानामुळे मानवाच्या जीवनाला गती मिळाली आहे . एका संस्कृत सुभाषितामध्ये विज्ञानाचे अतिशय सुंदर वर्णन केले आहे ,

अनेकसंशयोच्छेदि, परोक्षार्थस्य दर्शकम् ।
सर्वस्य लोचनं शास्त्रं, यस्य नास्त्यन्ध एव सः ॥

विज्ञानामुळे अनेक शंकांचे निरसण झाले आहे . अस्पष्ट गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत . विज्ञान हा मानवाला मिळालेला एक प्रभावी डोळा आहे. ज्या व्यक्तीला हा प्रभावी डोळा लाभला नाही तो खरोखरच आंधळा आहे. अर्थातच विज्ञानाचा चांगला उपयोग जो व्यक्ती करणार नाही त्याला त्याचे फायदे मिळणे शक्य नाही.

विज्ञान हा मानवी जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे . विज्ञानाने मानवी जीवन संपूर्णतः बदलून टाकले आहे. आज जगात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे विज्ञानच आहे . मग तरीही मानवाला पुन्हा पुन्हा प्रश्न का पडतो की ,विज्ञान हा माणसाला मिळालेला शाप आहे की वरदान?

खरंतर एका नाण्याच्या नेहमी दोन बाजू असतात, तसेच या विषयाचे आहे. विज्ञानाला आपण एकदम शाप आहे असे ही बोलू शकत नाही. विज्ञान हे मानवाला मिळालेले वरदानच आहे. पण त्याकडे बघण्याचा दृष्टीकोन आपण कसा ठेवतो यावर त्याची योग्य - अयोग्यता अवलंबून असते.  विज्ञानाचे अनेक उपयोग आहेत. मात्र आपण त्याचा योग्य पद्धतीने वापर करून घेतला पाहिजे.

विज्ञान हे मनुष्याच्या विकासासाठी लाभलेले एक प्रभावी साधन आहे. माणसाने विज्ञानाच्या सहाय्याने अनेक चमत्कार सिद्ध करून दाखवले आहेत. विज्ञानामुळे विविध गोष्टींचा शोध लागला आहे.  आरोग्य, शिक्षण, औद्योगीकरण सर्वक्षेत्रात क्रांती घडून आली आहे. उद्योगक्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर बदल घडून आले आहेत. विज्ञानामुळेच दळणवन, तंत्रज्ञानासारख्या क्षेत्रात मोठी प्रगती झाली आहे. विज्ञानामुळेच मानवाने अंतराळात झेप घेतली आणि मानवाला चंद्रावर ,मंगळ ग्रहावर पोहोचणे शक्य झाले.

विज्ञानामुळे मानवी जीवनात आमूलाग्र बदल झाला आहे. संगणकाच्या साहाय्याने तर माणसाने आज अशक्‍य वाटलेल्‍या गोष्टी प्राप्त केल्या आहेत. इंटरनेटच्या साहाय्याने दुरवर असलेली माणसे एकमेकांना रोज भेटू लागली आहेत.आज मोबाईल, टीव्ही, इंटरनेट, संगणक यामुळे पूर्ण जग एकत्र जोडले गेले आहे. विज्ञानाने कृषी उत्पादन क्षेत्र ,औद्योगिक क्षेत्र अशा विविध क्षेत्रांत आघाडीचे स्थान मिळवले आहे.

विज्ञानामुळे मानवाने ‘टेस्ट ट्यूब बेबी’ चा शोध लावला आहे. ‘क्ष’ किरणांच्या शोधामुळे अनेक आजारांचे निदान करणे अत्यंत सुलभ झाले आहे. स्कॅनिंग सारख्या काही उपचार पद्धतीमुळे ‘ब्रेन ट्युमर’, 'लंग्स कॅन्सर ' सारखे असाध्य रोग आता उपचार क्षम झालेले आहेत . एड्स, ल्युकेमिया, कर्करोग यांसारख्या अजून असाध्य अश्या रोगांवर याही पेक्षा प्रभावी उपचार शोधण्यासाठी शास्त्रज्ञ धडपड करीतच आहेत. तसेच अपंगांसाठी कृत्रिम अवयवांचा शोध लाऊन त्यांच्या समस्या दूर झालेल्या आहेत.

वैज्ञानिक शोधांमुळे मानवी जीवनात प्रगती झाली खरी परंतु त्याचा अतिरेक व दुरुपयोग वाईटच आहे. आज मानव पूर्णत: विज्ञांनावर अवलंबून आहे. विज्ञानाचा वापर नियंत्रित आणि नियोजित नसल्याने माणसाचे मानसिक संतुलन बिघडत आहे. औद्योगिकीकरणाने मोठ्या प्रमाणावर प्रदुषण झाले आहे. विविध शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा यांची निर्मिती विज्ञानामुळे शक्य झाली आहे . त्यामुळे होणारे युद्ध हे निसर्गाचे आणि पर्यायाने माणसाचे नुकसान करत असते. मानवाच्या अति  लोभामुळे आणि हव्यासापोटी विज्ञान शाप ठरत आहे.

विज्ञानाचे फायदे अनेक आहेत. पण त्याचा अतिरेक वापर केल्याने त्याचे दुष्परिणाम हे मानवालाच नव्हे तर संपूर्ण सजीव सृष्टीला भोगावे लागतील. म्हणून विज्ञानाचा सुयोग्य आणि सुजाणपणे वापर करणे गरजेचं आहे. तरच विज्ञान संपूर्ण सृष्टीसाठी वरदान ठरेल.







Written by Priyanka Kumbhar




No comments