Best Love Poem in Marathi, Love Poetry | मराठी प्रेम कविता


Love is all about being unconditional and conscious. Love is committed. In below you get an amazing Love Poem in Marathi, Love Poetry for your loved once. I hope you like our Love Poem in Marathi, Love Poetry and share with your friends. प्रेम ही एक भावना आहे. या कवितांमध्ये मी प्रेमाच्या भावना मोजक्याच शब्दांत मांडण्याचा प्रयत्न केला आहे.आशा आहे तुम्हा सगळ्यांना नक्की आवडेल…


अशीच एक संध्याकाळ - Marathi Poem on Love | मराठी प्रेम कविता


अशीच एक संध्याकाळ
साक्ष होती तुझ्या माझ्या
प्रेमाची, त्या मिलनाची
भावना उफाळून आलेल्या
त्या सुखद गोड क्षणांची…

अशीच एक संध्याकाळ
माझ्या मनात दाटलेली
परकी असूनही जेव्हा
तू आपलीशी वाटलेली…

अशीच एक संध्याकाळ
काहूरलेली, नभात साचलेली
संधीप्रकाशात मला ती
जेव्हा कातरवेल भासलेली…

अशीच एक संध्याकाळ
साक्ष होती माझ्या दुःखाची
सागराच्या लाटांप्रमाणे
उसळलेल्या माझ्या आसवांची…





शोध - Marathi Poem on Love | मराठी प्रेम कविता


परवा पुस्तकांच्या अडगळीत
ते क्षण शोधत होतो
त्यांच्यामध्ये रमलेले ते
माझे मन शोधत होतो…

फाटलेले पुस्तक पुसलेले शब्द
अर्थ त्यांचा शोधत होतो
कधीकाळी जुळलेला ते
नातं मी शोधत होतो…

पुस्तकांनी दिलेले ज्ञानाचे दिवे
प्रज्वलित पुन्हा करत होतो
आयुष्याच्या या वळणावर
त्याचाच प्रकाश शोधत होतो…

पुस्तकांशी संलग्न त्या शाळेच्या
आठवणी पुन्हा आठवत होतो
भावना उफाळून आलेले
ते क्षण मी शोधत होतो…

पुस्तके होते कवितांचे लेणे
त्या पुस्तकांच्या अडगळीत
त्या कवितांमध्ये रमलेलं
माझं मन मी शोधत होतो…





प्रीती - Marathi Poem on Love | मराठी प्रेम कविता


हल्ली तुझे बोलणे
भलतेच आवडू लागले
तुझे हसणे, तुझे रुसणे
मन वेडावू लागले…

तुझ्या नजरेचा कटाक्ष
तुझ्या चालण्याचा नाद
तुझ्या ओठांचा गुलाब
मन तरसवू लागले…

हल्ली तुझे वागणे
मला आवडू लागले
हळूच स्वतःशीच पुटपुटणे
स्वतःचे रूप निहारणे
मनात भरू लागले…

जरी तू बोलत
नसलीस माझ्याशी
थोडक्यात तुझ्यावर
प्रीती जडु लागली…





एकतर्फी प्रेम - Marathi Poem on Love | मराठी प्रेम कविता


तू माझ्याकडे पाहतेस ते
असंख्य राग मनात ठेवून
पण मी तुला पाहतो ते
अनेक स्वप्ने उराशी बाळगून

कदाचित माझे पाहणे ही
तुझ्या मते माझा गुन्हा असेल
पण तुझ्या एका नजरेसाठी
माझे मन आतुर असेल

तुला मिळवणे ही कधीच
माझ्या प्रेमाची अट नव्हती
कारण स्वप्नांच्या त्या जगात
तू नेहमीच माझी होतीस

मला माहित आहे तुझे
प्रेम माझ्या नशिबी नसेल
तरीही माझा प्रत्येक श्वास
तुझ्यासाठीच झुरत असेल

माझ्या प्रेमाची जाणीव तुला व्हावी
एवढेच पुरेसे असेल माझ्यासाठी
कधी मी समोर आलो तर
माझ्यावरचा द्वेष नजरेने दाखवण्यासाठी





तुझी आठवण - Marathi Poem on Love | मराठी प्रेम कविता


पुस्तकांच्या रांगेतील
कवितेच्या पुस्तकात
ते सुकलेले गुलाबाचे फुल
पुन्हा बहरलयं तुझ्या आठवणीत

कधीकाळी मोहक त्याचे रूप
ओझरले होते तुझीच वाट पाहून
ते गुलाबाचे सुकलेले फुल
जपून ठेवलाय मी तुझ्या आठवणीत

स्पर्श तुझा त्या फुलास झालाच नाही
माझे प्रेम कधी तू जाणलेच नाहीस
तुझ्या या अजाणतेमुळेच पुस्तकातले
फुल बनलो मी तुझ्या आठवणीत




All Poems Written by Keshav Kumbhar







2 comments

Swapnil dattatraya mandlekar said...

Woww all poems r Awesome 😊

QualityQuotes said...

Thank you!