Best Marathi Poem on Life, Marathi Poetry, Life Poem in Marathi | मराठी जीवन कविता

Life is precious so we have to make it happy. I hope you like our Best Marathi Poem on Life, Marathi Poetry and share with your friends. या कवितांमध्ये मी आयुष्यात आलेले अनुभव मोजक्याच शब्दांत मांडण्याचा प्रयत्न केला आहे.आशा आहे तुम्हा सगळ्यांना नक्की आवडेल…


व्यथा - Best Marathi Poem on Life | मराठी जीवन कविता


संगती मी जगाच्या काटेच वेचलेले
फुलांच्या धावाने रक्त माझं साचलेले

का आस मी धरावी तुटलेल्या तारकांची
क्षणातच सारे ज्यांचे आयुष्य संपलेले

अश्रुनांही आता जाग येत नाही
यातना या साऱ्या डोळ्यांत कोंडलेले

हा प्रश्न का पडावा व्यर्थ जीवनाचा
उत्तरही ज्याचे सारे रक्तात सांडलेले

शब्दांत मांडतो मी व्यथा जीवनाच्या
शब्द शब्द माझे सारे दुःखात माखलेले





जीवन - Best Marathi Poem on Life | मराठी जीवन कविता


जीवनाच्या या वाटेवर
कधी अंधारमय रात्र असते
कधी प्रकाशाची साथ असते
प्रकाशाच्या साथीत ताऱ्यांची आस असते
रात्रीच्या अंधारात त्यांचाच त्रास असतो
या वाटेवर खडकाळ माळरानही येते
सुंदर पायवाटही येते ,वणवेही येतात
आणि वादळेही उठतात
रंगीबेरंगी स्वप्नांचा एक ऋतूही येतो
चालता चालता सोबतीही भेटतात
चार पावले चालून आपलेसे होतात
पण एका निर्णायक क्षणी
अनोळखी होऊनी नाहीसे होतात
पण माणूस चालतो निरंतर एकाकी
उन्नतीचा ध्यास घेऊन
यश-अपयशायच्या डोंगरदऱ्या चढत
चढण उतरणीचा खेळ खेळत
शेवटी संध्यासमयी मृत्यूची दरी येते
तिथेच अंत असतो ,
जीवनाच्या वाटेचा अनंत चालण्याचा...





वृद्धत्व - Best Marathi Poem on Life | मराठी जीवन कविता


नदीकिनारी एक झाड होते
सुकलेले वृद्धत्वाला झुकलेले
पाने त्याची गळून गेलेली
खांदे त्याचे झुकलेले

संध्याकाळी एक पाखरू
येऊन त्यावर बसला
झाडाची अवस्था पाहून
खुद्कन तो हसला

तेवढ्यात एक वृद्ध पाखरू
त्याच्या बाजूला येऊन बसला
त्याच्याकडे पाहून तोही
गोड स्मित हसला

आणि त्या पाखरास म्हणाला
नाही चुकला कोणाला
निर्सगाचा फेरा असला
मग तुला गर्व कसला





आयुष्य - Best Marathi Poem on Life | मराठी जीवन कविता


आयुष्याच्या वाटेवर चालत आहे
अनादी अंधार डोळ्यांत लेवून
मला माझे भास नाही
ध्येयशीखर ना कुणीकडे

दांभिकतेचे रान सारे हे
प्रेमाचा ना स्पर्श इथे
पशु रानटी अवती भोवती
माणूस जगणे कठीण इथे

सुखाचे इथे क्षणभंगुर
अन् दुःखाची अखंड छाया
क्षणोक्षणीचे अवडंबर हे
माणुसकीची जळती काया

पदोपदिचे मरण आहे
पोटासाठी झुरणे आहे
दोन वक्ताच्या भाकरीसाठी
आयुष्य सारे संपले आहे...





जीवनाचा मर्म - Best Marathi Poem on Life | मराठी जीवन कविता


दूर माळरानावर मी
एकटाच चालत आहे
आयुष्याच्या सकाळी
जीवनाचा मर्म शोधत आहे

माळरानी पायवाटेवर या
ठसे पावलांचे दिसत आहे
त्या पावलांचे ठसे हे
बघुनी मजकडे हसत आहे

हलक्या हवेचा वारा येथे
आव्हान मज देत आहे
चिमुकले गवताचे पाते
मार्ग माझा अडवत आहे

सैरावैरी हे मन माझे
वळून पाहावयास खुणवत आहे
मी केलेल्या प्रेमाची
वल्गना करत आहे




All Poems Written by Keshav Kumbhar











5 comments

Swapnil dattatraya mandlekar said...

Khup Chan ahet poems 😊😊💝

विलास साळी said...

मला आवडलेल्या कविता,
“जीवन” आणि “वृद्धत्व”.
या कवितांच्या कवी चे नाव आणि Email कळावे ही इच्छा.

QualityQuotes said...

नमस्कार सर ! तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या वेबसाईट वरील कविता वाचल्या आणि तुमच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल सर्वप्रथम तुमचे मनःपूर्वक धन्यवाद . आम्ही प्रत्येक पोस्ट मध्ये सगळ्यात शेवटी कवीचे नाव नमूद केले आहे. या पोस्ट मधील सर्व कविता कवी श्री केशव कुंभार यांनी लिहिल्या आहेत आणि त्यांचा ई-मेल : keshav.kumbhar@gmail.com हा आहे.

kishor apte said...

काव्याच हे सदर छानच आहे मात्र यात हास्य व विडंबन तसेच पोवाडा हे प्रकार आसायला पाहिजेअसे वाटते

Quality Quotes said...

नमस्कार सर ! तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या वेबसाईट वरील कविता वाचल्या आणि तुमच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल सर्वप्रथम तुमचे मनःपूर्वक धन्यवाद . तुमच्या इच्छेनुसार आम्ही लवकरात लवकर हास्य व विडंबन तसेच पोवाडा हे प्रकार तुमच्या समोर नक्कीच सादर करू. आम्ही एक हास्यकविता पोस्ट केलेली आहे कृपया तुम्ही एकदा नक्की वाचा व तुमच्या प्रतिक्रिया कळवा .धन्यवाद !!! https://thequalityquotes.blogspot.com/2020/07/best-marathi-comedy-poem-on-relation.html