Best Marathi Poems on Love, Love Poems in Marathi, Love Poetry | प्रेम कविता


Love is a strong feeling of affection, affection and intimate love. Knowing the mind is the feeling of love ... !! In below you get an amazing Marathi poems on love, Love Poetry for your loved once. I hope you like our Marathi poem and share with your friends. प्रेम ही एक भावना आहे. या कवितांमध्ये मी प्रेमाच्या भावना मोजक्याच शब्दांत मांडण्याचा प्रयत्न केला आहे.आशा आहे तुम्हा सगळ्यांना नक्की आवडेल…


आधार - Marathi Poems on Love | प्रेम कविता


तुझे उदास बसणे
माझ्या हृदयाला टोचते
तुझ्या डोळ्यातले दुःख पाहून
माझे मन हळूच रडते

आपल्या दोघांचे नाते
तसे अनामिकच राहिले
मैत्री आणि प्रेम यामध्येच
कुठेतरी गुरफटले

तरी तुझ्या सोबतीचे क्षण
पुरेसे होते माझ्यासाठी
एक गोड आठवण म्हणून
हृदयात साठवण्यासाठी

आणि त्याच आठवणी
आधार माझ्यासाठी
कधी ठेच लागली तर
हळूच सावरण्यासाठी





आठवतं तुला - Marathi Poems on Love | प्रेम कविता


आठवतं का तुला
ते बेधूंद क्षण
प्रेमात आकंठ बुडलेले
ते आपले मन

त्या वेळी मी अगदी
वेडा झालो होतो
भावनांच्या पावसात
भिजून चिंब झालो होतो

आठवतं तुला त्या भावनेच्या भरात
तुझं नाव मी हातावर कोरलं होतं
खरं सांगू तेव्हा तुला मी
हृदयात कायमचं भरलं होतं

तुझीही अवस्था तेव्हा
माझ्यापेक्षा वेगळी नव्हती
तेव्हा तू प्रत्येक क्षण
माझ्यासाठीच झुरत होतीस

आता मात्र सर्वकाही संपले आहे
उरली आहे फक्त आठवण
आणि त्या आठवणीच आहेत
हृदयातील कायमची साठवण

मी मात्र त्या आठवणींतून
प्रत्येक क्षण जगत आहे
आणि प्रत्येक श्वासागणिक
हृदयात वादळ भरत आहे





आठवणींचा पाऊस - Marathi Poems on Love | प्रेम कविता


ओल्याचिंब उदास संध्येला
उद्विग्न उभा होतो मी
गतकाळाच्या अंधारात
वर्तमानाचे भान विसरून होतो मी

तुझ्या आठवणींचा पाऊस
मनाचे बांध फुटेस्तोवर पडत होता
सर्व संपवून थांबत होता
तरीही आपलेसा वाटत होता

कारण अंधुकशा उजेडात
तुझा चेहरा उमटवत होता तो
भावनाशून्य भावनाविरहित
अबोल मूर्तीसारखा होता …





प्रेम - Marathi Poems on Love | प्रेम कविता


प्रेम म्हणजे काय असते
प्रेम म्हणजे माया असते
ममतेची काया असते
आपुलकीची ,मैत्रीची छाया असते

प्रेम म्हणजे काय असते
प्रेम फुल असते
मातीची चूल असते
निरागस गोंडस मूल असते

प्रेम म्हणजे काय असते
प्रेम म्हणजे आग असते
सप्तसुरांचा राग असतो
भक्तीही प्रेमाचाच एक भाग असतो

प्रेम म्हणजे काय असते
प्रेम म्हणजे आस असते
प्रेम म्हणजे भास असते
प्रेमामध्ये देवाचेच वास असते

प्रेम म्हणजे काय असते
प्रेम म्हणजे प्रेम असते
कधी साधलेलं तर कधी
चुकलेला नेम असते .





तुझी भेट - Marathi Poems on Love | प्रेम कविता


आठवणी पुन्हा परतल्या मनाच्या तळापाशी
तू भेटली या वळणावर , एक सळ खुपली उराशी

मी गोंजारले होते दुःखांना माझ्या
बेईमान या सुखाची साथ ही जराशी

बदलले रस्ते आपुले , बदलल्या पायवाटा
एक मूल एकटेच उभे , तरी त्या वळणाशी

बरसून गेला आज एकटा , पाऊस हा अदाशी
विसरला तो खेळ कालचा , जो खेळलेला उन्हाशी

भेगाळलेली आहे ही जमीन मनाची
देशील का तुझी कुशी रडायला जराशी




All Poems Written by Keshav Kumbhar






No comments