Best Marathi Quotes on Love, Status, Shayari and SMS | मराठी प्रेम संदेश
Love is so precious. Love is a strong feeling of affection, affection and intimate love. Knowing the mind is the feeling of love ….. !! In below you get an amazing Marathi Love Quotes, Status, Shayari and SMS for your loved once. I hope you like our Marathi Love Quotes, Status, Shayari and SMS and share with your friends. प्रेम ही एक भावना आहे. या पोस्टमध्ये मी प्रेमाच्या भावना मोजक्याच शब्दांत मांडण्याचा प्रयत्न केला आहे.आशा आहे तुम्हा सगळ्यांना नक्की आवडेल…
मोरपीस - Best Marathi Quotes on Love| मराठी प्रेम संदेश
त्याच्या बटव्या मधला तो
मोरपीस पार चुरगळलेला
आठवलं तेव्हा त्याला
त्या पंखाप्रमाणे कुणासाठीतरी
त्याचं हृदय घुसमटलेला
तुझ्या आठवणी - Best Marathi Quotes on Love| मराठी प्रेम संदेश
तुझ्या आठवणी घायाळ करतात
सुख दुःखातही समांतर
शोधण्या तुझ्या पाऊलखुणा
जीवन जगतो मी अवांतर
शिक्षा - Best Marathi Quotes on Love| मराठी प्रेम संदेश
तुझ्या येण्याची आस नाही
तरी तुझी वाट पाहतोय
मनापासून तुझ्यावर प्रेम करायची
हीच शिक्षा भोगतोय
भावना - Best Marathi Quotes on Love| मराठी प्रेम संदेश
आसुसलेल्या मनाला
शब्दांनी दिलासा दिला
मग अतृप्त या डोळ्यांनी
भावनांचा खुलासा केला
सराव जगण्याचा - Best Marathi Quotes on Love| मराठी प्रेम संदेश
तुझ्याशिवाय जगणे आता
कठीण वाटत आहे
म्हणूनच मेल्यासारखे जगण्याचा
मी सराव करत आहे
मनाचे वेध - Best Marathi Quotes on Love| मराठी प्रेम संदेश
तुझ्याशी बोलताना
जीवाची तारांबळ उडते
तुझ्या मनाचे वेध घेत
मन माझे झुरते
आठवणींची लाट - Best Marathi Quotes on Love| मराठी प्रेम संदेश
मनाच्या या सागरात रोज
विचारांची भरती असते
त्यातही तुझ्या आठवणींची
क्षणोक्षणी लाट उसळते
सहवास - Best Marathi Quotes on Love| मराठी प्रेम संदेश
शुष्क जमिनीला जसे
पावसाचा एक थेंब दिलासा देतो
तुझ्या सहवासाचा एक क्षण तसा
माझ्या मनाला आधार देतो
तुला भेटल्यावर - Best Marathi Quotes on Love| मराठी प्रेम संदेश
तुला भेटल्यावर पुन्हा
गंध मातीत दरवळे
सैरवैर मनामध्ये
साचे पावसाचे तळे
व्यर्थ जिणं - Best Marathi Quotes on Love| मराठी प्रेम संदेश
तुझ्यापेक्षा तुझी वाट
पाहणेच मला प्रिय होते
पण आता ते ही संपलं आहे
बस व्यर्थ जिणं जगत आहे
All Quotes Written by Keshav Kumbhar
No comments
Post a Comment