Inspirational Marathi Poem on Married Life , Marathi Poetry | मराठी विवाहित जीवन कविता
Married Life is precious so we have to make it happy. It is based on love and trust. I hope you like our Inspirational Marathi Poem on Married Life , Marathi Poetry and share with your friends. या कवितांमध्ये मी विवाहित विवाहित जीवन कसे असावे हे मोजक्याच शब्दांत मांडण्याचा प्रयत्न केला आहे.आशा आहे तुम्हा सगळ्यांना नक्की आवडेल…
संसाराची गुरुकिल्ली - Marathi Poem about Happy Married Life | मराठी विवाहित जीवन कविता
संसार … हा दोघांचा
जपलेल्या अनेक नात्यांचा
प्रेम आणि विश्वासाचा…
प्रेम म्हणजे गुरु आणि
विश्वास जणू किल्ली
जेथे वसे हे दोन्ही त्यांच्या
हाती संसाराची गुरुकिल्ली…
-प्रियांका कुंभार
सप्तपदींचे सात वचन - Marathi Poem about Happy Married Life | मराठी विवाहित जीवन कविता
सात फेरे हे सप्तपदींचे
ऋणानुबंध सातजन्माचे
सात वचने ही सहजीवनाची
सुरुवात करूया नव्या युगाची
विवाह जरी हे बंधन असले
बंधनात कधी ना ठेवेन तुला
पहिले वचन सखे देतो तुला
सदा आनंदी ठेवेन तुला
जर कधी भासले मला असे
संपूर्ण जग तुझ्या विरोधी जसे
दुसरे वचन प्रिये देतो तुला
आजन्म साथ देईन तुला
तुझ्या चेहऱ्यावरील हास्य हे
सदा बहरु दे असेच हे
तिसरे वचन साजणी देतो तुला
आयुष्यभर असेच खुलवेन तुला
तुझी स्वप्ने पाहण्यास
स्वतंत्र आहेस सदैव तू
चौथे वचन मनमोहिनी देतो तुला
स्वप्नातील तू मिळवून देईल तुला
कितीही व्यस्त असलो तरी
दुःखाचे डोंगर कोसळले जरी
पाचवे वचन प्राणप्रिये देतो तुला
माझा संपूर्ण वेळ नेहमी देईन तुला
आजपर्यंत ज्या सुखासाठी व्याकुळ झालीस
बंधनामुळे मनासारखी जगली नाहीस
सहावे वचन सहजीवनी देतो तुला
प्रत्येक क्षण सुखात ठेवेन तुला
डोळ्यांतील हे अश्रू तुझे
आता सदैव माझे झाले
सातवे वचन अर्धांगी देतो तुला
शेवटच्या श्वासापर्यंत हसवेन तुला
-प्रियांका कुंभार
All Poems Written by Priyanka Kumbhar
No comments
Post a Comment