Marathi Essay on Mahatma Gandhi, Mahatma Gandhi Information in Marathi | महात्मा गांधी मराठी निबंध लेखन

Marathi essay writing topics for school students, essay topics for class 10. I hope you'll like this articles related to essay in Marathi on Mahatma Gandhi. मराठी निबंध लेखन हे विद्यार्थ्यांसाठी तसेच इतर सर्वांसाठी अतिशय उपयुक्त आहे. आशा आहे तुम्हा सगळ्यांना नक्की आवडेल…


महात्मा गांधी - एक थोर पुरुष


महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. महात्मा गांधी यांना 'राष्ट्रपिता' म्हणून ओळखले जाते. तसेच त्यांना 'बापू' या नावानेही संबोधले जात असे . महात्मा गांधीजींचा जन्म दोन ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरात येथील पोरबंदर येथे झाला. मोहनदास लहानपणापासूनच शिस्तबद्ध आणि आज्ञाधारक होते .'नेहमी खरे बोलावे' असा त्यांचा निर्धार होता.

महात्मा गांधीजी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर १८८८ मध्ये कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी ते इंग्लंडला गेले. तेथे त्यांनी वकिलीची परीक्षा पास केली आणि त्यांना बॅरीस्टर ही पदवी मिळाली. १८९१ मध्ये भारतात परतल्यानंतर त्यांनी वकिलीला सुरवात केली. परंतु पुढे काही दिवसांनी ते आफ्रिकेत गेले आणि तेथे त्यांनी वकिलीचा व्यवसाय सुरु केला.व्यवसाय सुरु असतानाच तेथील हिंदवी लोकांवर होणारा अन्याय त्यांच्या निदर्शनास आला. तेव्हा त्यांनी भारतीयांच्या अधिकाराच्या आंदोलनात सहभाग घेतला. त्यांना स्वतःलाही अनेक वाईट अनुभव आले . तेव्हा या अन्यायाविरुद्ध आपण लढले पाहिजे असा त्यांनी पण केला . आंदोलनाचे नेतृत्व करून त्यांनी अहिंसात्मक आंदोलनाद्वारे आपले हक्क मिळविण्यासाठी अन्यायाविरुद्ध चळवळ सुरु केली. तेथील हिंदवी लोकांना त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव महात्मा गांधी यांनी करून दिली. त्यांचे हक्क त्यांना मिळवून दिले. पुढे त्यांनी सत्याग्रह शिबिराची स्थापना केली.

१९१४ मध्ये ते भारतात परतल्यानंतर गांधीजी 'महात्मा' म्हणून विख्यात झाले. भारतीयांच्या स्वातंत्र्यसाठी त्यांनी प्रयत्न सुरु केले. इंग्रजांविरुद्ध लढा उभारला.तसेच शेतकर्‍यांच्या हक्कांसाठी आंदोलन केले. पुढे अहिंसक असहकार आंदोलन, दांडी येथील मीठाचा सत्याग्रह आणि सविनय कायदेभंग,व्यक्तिगत सत्याग्रह आणि १९४२ चे भारत छोडो आंदोलन या सार्‍यात महात्माजींचे नेतृत्व झळाळून उठले.स्वातंत्र्याचा लढा लढत असताना संपूर्ण देश गांधीजींच्या पाठी उभा राहिला होता. त्या दरम्यान गांधीजींना अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला होता. त्यांनी अनेक हालअपेष्ठा सहन केल्या .

'स्वतंत्र भारत' हे गांधीजींचे स्वप्न होते. गांधीजींनी सत्य , अहिंसा , शांती  यांचा आयुष्यभर प्रसार केला . ९ ऑगस्ट १९४२ ला त्यांनी मुंबईत करा किंवा मरा असे आवाहन जनतेला केले.त्यांनी अनेक लोकांना स्वावलंबी बनवले. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आणि पंधरा ऑगस्ट १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळाले.त्यानंतर काही  दिवसांनी देशासाठी त्याग करणारे गांधीजी तीस जानेवारी १९४८ मध्ये निधन पावले. ते चांगले समाज सुधारक, कुशल अर्थज्ज्ञ होते. त्यांच्या सरळ, साध्या व सोप्या भाषेचा प्रभाव लाखो लोकांवर पडत असे. भारतीयांना अभिमान वाटणारे असे महात्मा गांधी हे एक महान व्यक्तिमत्व होते.








Written by Priyanka Kumbhar


No comments