Marathi Essay on Corona Virus, Corona Virus Information in Marathi | कोरोना विषाणू (व्हायरस) मराठी निबंध लेखन

Marathi essay writing topics for school students, essay topics for class 10. I hope you’ll like this articles related to essay in Marathi on Corona Virus. मराठी निबंध लेखन हे विद्यार्थ्यांसाठी तसेच इतर सर्वांसाठी अतिशय उपयुक्त आहे. आशा आहे तुम्हा सगळ्यांना नक्की आवडेल…


कोरोना - एक जीवघेणा विषाणू


कोरोना विषाणू (व्हायरस) हा एक संसर्गजन्य रोग आहे. या विषाणूमुळे होणारा रोग हा सामान्यतः सस्तन प्राणी आणि पक्ष्यांमध्ये आढळून येतो.या विषाणूचा प्रसार मानवांमध्ये श्वसन संसर्गाने होतो. २०१९ मध्ये कोरोना विषाणूचा एक उपघटक चीनमधील वूहान शहरात आढळून आला होता . म्हणून या नवीन विषाणूला कोव्हिड-१९ असे नाव देण्यात आले. हा विषाणू त्याच्या इतर उपप्रकारांपेक्षा अधिक तीव्र असून तो झपाट्याने संपूर्ण जगभरात पसरला आहे .तसेच या विषाणूमुळे रोग्यांचे मृत्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत चालले आहे .

 १९३० च्या दशकात कोरोना विषाणूमुळे होणारा रोग हा पहिल्यांदा पाळीव कोंबड्यांमध्ये आढळून आला होता. या रोगामुळे कोंबड्यांना तीव्र श्वसन झाल्याचे दिसून आले होते. त्यानंतर १९४० मध्ये काही प्राण्यांमध्ये कोरोना विषाणू आढळून आल्याचे समोर आले होते. पुढे १९६० साली पहिल्यांदाच मानवी कोरोना विषाणू (व्हायरस) सापडले. या रोगामुळे बहुतेकांना श्वसनमार्गाच्या गंभीर आजाराचे संक्रमण होते.

२०१९ मध्ये चीनमध्ये आढळून आलेला हा विषाणू पुढे काही महिन्यांमध्येच  जगभरात मोठ्याप्रमाणात पसरला आणि या विषाणूमुळे जगात मृत्यूचे थैमान सुरु झाले. ८ जुलै २०२० अखेर जगात ११,६३५,९३९ जणांना या आजाराची लागण झाली असून एकूण ५,३९,०२६ जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण २१३ देशांमध्ये हा आजार पसरला आहे.या रोगाचा सातत्याने मोठ्या प्रमाणावर उद्रेक होत आहे .

कोरोना विषाणू रोगाची सर्वसामान्य लक्षणे म्हणजे ताप , कोरडा खोखला ,श्वसनास त्रास , डोकेदुखी ,वेदना , घशाला त्रास , थकवा , अतिसार , नाक वाहणे , शिंका येणे अशी आहेत. ही लक्षणे सुरुवातीला सौम्य असतात व हळूहळू सुरु होतात . वृद्ध लोक आणि उच्च रक्तदाब, हृदयरोग किंवा मधुमेह यासारख्या मूलभूत वैद्यकीय समस्या असलेल्या लोकांना गंभीर आजार होण्याची शक्यता असते. अशा लोकांना या आजाराची झपाट्याने लागण होते आणि कालांतराने काही लोकांचा या जीवघेण्या विषाणूमुळे मृत्यूही  होतो .

या आजारावर अजूनही निश्चित असे औषध सध्या उपलब्ध नाही.परंतु या आजाराचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रत्येक माणसाने आपली स्वतःची काळजी घेणे अत्यावश्यक आहे . या रोगापासून बचाव करण्यासाठी सतत स्वच्छ हात धुवावे , हातरुमाल किंवा टिश्यू पेपरचा वापर करावा, तोंड, नाक, चेहरा, डोळे यांना स्पर्श करू नये, कमीत कमी तीन फुटाचे अंतर ठेवावे, आंबट चवीच्या फळांचा आहारात समावेश करावा .

अशा या जीवघेण्या कोरोना व्हायरसच्या विरोधात लढा द्यायचा असेल तर प्रत्येकाने आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्याची अत्यंत गरज आहे.प्रत्येकाने स्वतःबरोबरच दुसऱ्याची देखील काळजी घेणे आवश्यक आहे.घरी राहा . सुरक्षित राहा.







Written by Priyanka Kumbhar

No comments