Marathi Essay on My Father, My Father Information in Marathi | माझे बाबा मराठी निबंध लेखन
Marathi essay writing topics for school students, essay topics for class 10. I hope you’ll like this articles related to essay in Marathi on Maze Baba. मराठी निबंध लेखन हे विद्यार्थ्यांसाठी तसेच इतर सर्वांसाठी अतिशय उपयुक्त आहे. आशा आहे तुम्हा सगळ्यांना नक्की आवडेल…
माझे बाबा - कुटुंबाचा आधारस्तंभ
'बाबा' या एका शब्दातच जणू शंभर हत्तींचे बळ असल्याचा भास होतो. प्रेमळ, शिस्तबद्ध आणि निडर व्यक्तिमत्व म्हणजे 'बाबा' होय. आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये आई - वडिलांचे सर्वोच स्थान असते . आपण आई वडिलांमध्येच देवाचे स्वरूप पाहत असतो. आईची माया आणि वास्तल्य यामुळे घर प्रसन्न असते तर बाबांचे प्रेम आणि काळजी यांनी घर प्रफुल्लित असते. बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारे एक महान व्यक्ती.
वडील हे घरातील कर्ते पुरुष असतात.त्यांचावर संपूर्ण कुटुंबाची जवाबदारी असते. बाबा नेहमी स्वतःच्या इच्छा, आकांक्षा बाजूला ठेवून आपल्या कुटुंबासाठी झटत असतात . ते आपल्या मुलांच्या गरजा आणि सुखसोयी यांची पूर्तता करण्यासासाठी रात्रंदिवस कष्ट करतात . ते कुटुंबाचा आधारस्तंभ असतात . माझे बाबा एक सक्षम पिता आहेत. बाबांचे कौतुक कितीही केले तरी कमीच वाटते. बाबांचे अथक परिश्रम पाहून माझ्या मनात नेहमी विचार येतात ,
काय गाऊ बाबा
तुमची अगणित महती
शब्द अपुरे पडतील
करण्यास तुमची स्तुती ||
तुम्ही आमचे पालनकर्ता
तुम्ही आमचे विघ्नहर्ता
तुम्ही आमचे कैवारी
सगळ्या दुःखास तारी ||
तुम्ही प्रेमाचा सागर
तुम्ही दयेचा डोंगर
तुम्ही मायेचा पाझर
आमचा एकमेव आधार ||
माझे बाबा श्री. अशोक कुंभार. अगदी सरळ आणि साधे व्यक्ती . आई-वडिलांचीआर्थिक परिस्थिती अतिशय गरीब असल्यामुळे त्यांनी लहान वयातच फार दुःख सोसले. लहान वयातच कष्ट करून दुःखाचे दिवस काढत ते मोठे झाले . आपल्याला जे सुख मिळाले नाही ते आपल्या मुलांना मिळावे यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात .
आईने मला जन्म दिल्यानंतर बाबांमुळे माझं अस्तित्व सुरु झालं . बोट धरून चालायला शिकवणारे तर घोडा बनून मला हसवणारे माझे बाबा एक परिपूर्ण पिता आहेत. माझे बाबा माझ्यासाठी एक आदर्श आहेत. ते अतिशय प्रमाणिक आणि अपार कष्ट करणारे व्यक्ती आहेत. माझे बाबा खूप विनम्र आणि शांत स्वभावाचे आहेत. तसेच त्यांच्या प्रेमळ आणि मनमिळाऊ स्वभावामुळे घर नेहमी आनंदात असते. दिवसरात्र मेहनत करून सुद्धा ते त्यांचा अमूल्य वेळ आपल्या कुटुंबासोबत आनंदाने घालवतात .
असं म्हणतात बाबांचे प्रेम दिसून येत नाही . पण खरंतर त्यांचे निरपेक्ष प्रेम हे त्यांच्या कष्टातून आणि कुटुंबाच्या काळजीतून लगेच जाणवते . भलेही ते कधी कधी रागवतात , चिडचिड करतात पण आपली मुले आजारी असली की रात्रभर जागून त्यांची काळजी घेतात . बाबांना नेहमी आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची चिंता असते. ते मुलांसाठी आपल्या सुखाचा त्याग करणारे एकमेव मूर्तिमंत उदाहरण आहेत .
माझे बाबा हे एका वट वृक्षाप्रमाणे आहेत . ते सदैव आपल्या कुटुंबासाठी अनेक दुःख आणि वेदना सहन करतात आणि सगळ्यांना सुखी ठेवतात . आपल्या कुटुंबासाठी ते नेहमी संकटांशी संघर्ष करतात . अशा महान बाबांचे ऋण मला आजन्म फेडता येणार नाही. मला माझ्या बाबांचा खूप खूप हेवा वाटतो.
No comments
Post a Comment