Best 15th August Happy Independence Day Quotes in Marathi, Status, Wishes, Message, SMS, Shayari, Images | मराठी १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्याशुभेच्छा संदेश


Happy 74th Independence Day to Everyone !!! Independence Day is annually celebrated on 15 August in India.  It is a national holiday. Let's celebrate Independence day and salute our Heroes.  In below you get an amazing 15th August Happy Independence Day Quotes in Marathi, Status, Wishes, Message, SMS, Shayari, Images. I hope you like our 15th August Happy Independence Day Quotes in Marathi, Status, Wishes, Message, SMS, Shayari, Images and share with your friends. १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा ! चला या सुंदर स्वातंत्र्य दिनाचा आनंद घेऊया. आशा आहे तुम्हा सगळ्यांना नक्की आवडेल…


Marathi Quotes on Happy Independence Day | स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा संदेश


स्वातंत्र्य सदैव मनात असू दे
विश्वास शब्दांवर कायम राहू दे
भारतीय असल्याचा गर्व नसानसांत स्पृहू दे
आत्मनिर्भर भारत लवकर घडू दे…
चला तर ७४ व्या स्वातंत्र्य दिनी
देशाला अभिवादन करूया!
वंदे मातरम्!!!






चला निर्णय घेऊया,
आपल्या देशाचे मूल्य जाणूया ,
प्राणाचे बलिदान दिलेल्या वीरांना नमन करूया,
अन् त्यांच्या त्यागाचे स्मरण करूया,
आपले कर्तव्य जाणून घेऊया,
अन् देशात सुधारणा घडवूया…
स्वातंत्र्यदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा…






वाईट, भ्रष्टाचार आणि दहशतवादाविरोधात भूमिका घेऊया
हिंदू , मुसलिम, सीख , इसाई सगळे मिळून एकत्र राहूया
एक स्वतंत्र आत्मनिर्भर आणि प्रगतशील भारत निर्माण करूया
जय हिंद !!!




चला आज आपण भारतीय पुन्हा एकत्र येऊया
ज्या वीरांमुळे आपण स्वतंत्रपणे श्वास घेत आहोत
त्या भारतमातेच्या सुपुत्रांच्या त्यागाचे स्मरण करूया
आणि त्यांना विनम्रपणे अभिवादन करूया






चला कठोर परिश्रम करूया
आपल्या देशाचे नाव कमवुया
आपल्या हातांना शस्त्र बनवूया
अन् स्वप्नांपेक्षा सुंदर असा
नवभारत घडवूया...






आज स्वातंत्र्याचे ते क्षण लक्षात ठेवूया,
भारत देशासाठी बलिदान देणाऱ्या शूर सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करूया ,
चला आज त्यांच्या बलिदानास आणि शौर्यास सलाम करूया…






स्वातंत्र्य ही अशी एक गोष्ट आहे
जी पैशाने विकत घेता नाही,
यासाठी लाखो शूरवीरांच्या
संघर्षांचे परिणाम साक्ष आहेत.
चला तर आज आणि कायमच
त्या सुपुत्रांचा सन्मान करू या.
स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा २०२० !






चला उठा एकत्र येऊया
आज या स्वातंत्र्यदिनी,
आपल्या महान राष्ट्राची
शांती आणि ऐक्य सुरक्षित
ठेवण्याचा संकल्प घेऊया.






स्वातंत्र्य प्रत्येकासाठी आहे
त्यास रंग किंवा आकार नाही
देशातील द्वेष आणि हिंसाचार नष्ट करून
प्रेम आणि समजूतदारपणाने आपले
उज्ज्वल भविष्य घडवण्याची आवश्यकता आहे.
चला एक सृजनशील भारत या स्वातंत्र्य दिनी घडवूया !






आपला भारत विभिन्नतेने नटलेला आहे
आपण सर्व भिन्न आहोत तरीही
स्वातंत्र्यदिनी आपण सगळे एकत्र येतो
ही आपल्या देशाची एकता आहे
आपण त्याचा सन्मान केला पाहिजे
या सुंदर स्वातंत्र्य दिनाचा आनंद घ्या !





All Quotes Written by Priyanka Kumbhar