Best Sad Love Poem in Marathi, Sad Love Poetry | मराठी प्रेम कविता


Love is all about being unconditional and conscious. Love is committed. In below you get an amazing Sad Love Poem in Marathi, Sad Love Poetry for your loved once. I hope you like our Love Poem in Marathi, Love Poetry and share with your friends. प्रेम ही एक भावना आहे. या कवितांमध्ये मी प्रेमाच्या भावना मोजक्याच शब्दांत मांडण्याचा प्रयत्न केला आहे.आशा आहे तुम्हा सगळ्यांना नक्की आवडेल…


वादळ - Marathi Sad Poem on Love | मराठी प्रेम कविता


वादळात या वादळ उठे
उच्छुन्खल भावनांचे
पावसात या पाऊल पडे
गोड तुझ्या आठवणींचे...

सहवास तुझा भास देई
त्या क्षणांचाही त्रास होई
दिसे डोळ्यांना रूप तुझे
मूर्तिमंत तस्वीर जसे...

जीवन असे स्तब्ध झाले
अशा मनाच्या लोपल्या
युगसमांतर रात्र आली
सुर्यप्रदेशात मात झाली...




किनारा - Marathi Sad Poem on Love | मराठी प्रेम कविता



त्या एका क्षणासाठीच
तर मी जगत होतो

तुझ्या एका प्रेमासाठी
क्षणोक्षणी लढत होतो

तुला पाहण्यासाठी रोज
सरणावर जळत होतो

तुझ्या नजरेचा वेध घेत
मनोमनी झुरत होतो

तरी तू नकार दिला
रोज आसवे गिळत होतो

मनातले सारे दुःख लपवून
सर्वांसमोर हसत होतो

फाटलेले मन पुन्हा जोडीत
नातीगोती जपत होतो

तू समोर अली अन् वादळ उठले
किनारा पुन्हा शोधात होतो




All Poems Written by Keshav Kumbhar


No comments