Best Poem on Rain in Marathi, Marathi Poetry | मराठी पाऊस कविता

  



A rainy season is also known as a wet season or monsoon season . It is the lovely season for all of us. We all have some different reasons to wait for the rainy season eagerly. It gives one of the best natural scenery . In below you get an amazing Poem on Rain in Marathi, Rain Poetry for your loved once. I hope you like our Poem on Rain in Marathi, Rain Poetry and share with your friends.  या कवितामध्ये मी पावसातील आठवणी मोजक्याच शब्दांत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आशा आहे तुम्हा सगळ्यांना नक्की आवडेल…


पहिला पाऊस - Marathi Poem on Rain | मराठी पाऊस कविता


आल्या पावसाच्या धारा 
संगे घेऊनिया वारा 
पानापाचोळ्यांचा सडा 
उडे गगनात सारा 

मेघ नभात साचता
कृष्ण धवलं नजारा
आल्या चैतन्याच्या लाटा 
मोर फुलवी पिसारा 

साऱ्या सृष्टीचा पसारा 
भिजे चिंब चिंब सारा 
वैशाखात तापलेल्या 
गंध मातीचा तो न्यारा 

धुंद होऊन विद्युलता 
करी प्रकाशाचा मारा 
साथ देई मेघराजा 
वाजे सृष्टीचा नगारा







आठवणींचा पाऊस - Marathi Poem on Rain | मराठी पाऊस कविता


निळ्याभोर आभाळात 
ढगांची गर्दी होते 
मंद वारा सुटतो अन् 
पावसाची वर्दी येते 

थेंब थेंब पाऊस गातो 
चिंब चिंब गाणी 
मनातही डोकावून पाही 
पावसाचे पाणी 

मातीला गंध देऊन पाऊस 
आपले पंख खोलू लागतो 
उनाड वाऱ्याबरोबर तो 
आक्रमकतेने बोलू लागतो 

आठवणींची गर्दी होते 
मग मनाच्या नभात 
सारेच क्षण ओले होतात 
पावसाच्या पाण्यात 

अशा या पावसातच मी 
प्रेमाचे ते गीत लिहिले होते 
शब्द शब्द तेव्हा सारे 
पाण्यात भिजले होते 

पावसाच्या पाण्याप्रमाणे तेव्हा 
मी ही वेडा झालो होतो 
खंडर होऊन गेलेला एक 
जुनाट वाडा झालो होतो 

आता माझं सारं कळून 
चुकलंय माझेच मला 
ओसरला आहे कधीच 
प्रेमाचा तो तात्पुरता तळा 

ठेच लागली कित्येकदा तरी 
पावसात भिजणे टळत नाही 
कळून चुकलं सारं तरी 
काहीच  कसे वळत नाही







पाऊस मनीचा - Marathi Poem on Rain | मराठी पाऊस कविता


पाऊस मनीचा कधी सरणार आहे 
काठोकाठ प्याला आता भरणार आहे 

बंध मनाचे सारे तुटले आता हे 
दुःख आसवांत सजणार आहे 

अडखळले जे गीत निःशब्द भावनांचे 
शब्दातून ओठावर ते फुलणार आहे 

यातना हृदयातल्या डोळ्यांत साचलेल्या 
सांग कधी दुःखात भिजणार आहे 

सावली आता मज सोडून जाणार 
अंधारच तिचे अस्तित्व पुसणार आहे 





All Poems Written by Keshav Kumbhar






2 comments

Unknown said...

Khup chhan ahet sagalya kavita..

Quality Quotes said...

Thank You for your valuable response!!