Marathi Essay on Ganesh Visarjan, Ganpati Visrjan Information in Marathi | श्री गणेश विसर्जन , गणपती विसर्जन मराठी निबंध लेखन
Marathi essay writing topics for school students, essay topics for class 10. I hope you’ll like this articles related to essay in Marathi on Ganesh Visarjan, Ganpati Visrjan. श्री गणेश विसर्जन , गणपती विसर्जन मराठी निबंध लेखन हे विद्यार्थ्यांसाठी तसेच इतर सर्वांसाठी अतिशय उपयुक्त आहे. आशा आहे तुम्हा सगळ्यांना नक्की आवडेल…
गणपती विसर्जन - एक अनोखी सुरुवात
'गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या', 'गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला'…'एक दोन तीन चार, गणपतीचा जयजयकार', या जयघोषांसह वाजत गाजत आलेले आपले लाडके बाप्पा आज अखेर त्यांच्या गावी गेले. यंदाच्या गणेशोत्सवातील पहिला (दीड दिवसांचा) विसर्जन सोहळा आज पार पडला. दीड दिवसांच्या गणपती बाप्पाला भक्तीमय वातावरणात भावपूर्ण निरोप देण्यात आला.
गणपती बाप्पा म्हणजे महाराष्ट्राचं काय तर भारताचं लाडकं दैवत. सगळ्या धर्माचे, जातीचे लोक अगदी आवडीने बाप्पांचे स्वागत करतात. वर्षभर आपण बाप्पांची केवढ्या आतुरतेनं वाट पाहत असतो ना! गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी अगदी महिनाभर आधीपासून देशभर प्रत्येक घराघरांत सुरू झालेली असते. बाप्पासाठी मखर, फुलांची आरास,विविध शोभेच्या वस्तूंची सजावट , नैवेद्य सारी लगबग असते. ११ दिवस गणेशोत्सवाची सगळीकडे धूम असते. जरी सार्वजनिक मंडळांचे गणपती अकरा दिवस म्हणजेच अनंत चतुर्थी पर्यंत असले तरी अनेक घरगुती गणपती मात्र दीड दिवसांचेच असतात. तेव्हा बऱ्यापैकी घरगुती बाप्पांचं विसर्जन दीड दिवसांनी झालेलं असतं. दीड दिवसानं मूर्ती विसर्जन करण्यामागची परंपरा काही वेगळीच आहे.
गणपती बाप्पा जेव्हा ढोल ताशांच्या गजरात आगमन करतात तेव्हा घर किती भरल्यासारखे वाटते . मनाला प्रसन्न करणारे वातावरण चोहीकडे असते. जिकडे-तिकडे अल्लाहदायक आणि रम्य वाटते. आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची मनोभावे पूजा केल्यानंतर मनात एक विश्वास दृढ होतो. सारे काही ठीक होईल ही आशा मनात प्रबळ होते. पण आज विसर्जन करून घरी आल्यावर घर अगदी मोकळं पाहून मन भरून आले.
बाप्पांचे विसर्जन करून घरी आल्यावर मनात असंख्य प्रश्नांनी गोंधळ उडाला होता. खरंच आपण गणेशोत्सव श्रद्धेने करतो का ? आपण ज्या बाप्पाला वाजत गाजत आपल्या घरी आणतो त्याचे विसर्जन आपण योग्य पद्धतीने करतो का ? आपण पर्यावरणाचे संगोपन करतो का ? जगात होणाऱ्या आपत्तींना कोण जबाबदार आहे ? जगात होणार हा विनाश निसर्गनिर्मित आहे कि मानवनिर्मित ?
आजकाल गणेशोत्सव एक धार्मिक सण नाही तर एक व्यवसाय आहे असं म्हणावं लागेल. गणपतींच्या मूर्तींचे व्यवसाय करणारे लोक प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवून अवाढव्य भावाने विकतात. शाडूच्या मूर्तींची किंमत तर गगनाला भिडलेली असते. जेवढी मूर्ती मोठी तेवढी तिची किंमत! श्रद्धेच्या नावाखाली सगळीकडे पैशांचा बाजार सुरु आहे असे नाही का वाटत ?
मनुष्याच्या प्रवृत्तीचा विचार केला की, कधी कधी स्वतःवरच हसू येतं! आपण देवाला अगरबत्ती लावतो पण सुवास मात्र आपल्या आवडीचा! आपण बाप्पाला मनोभावे घरी आणतो . आनंदाने पूजा अर्चना करतो. पण विसर्जन केल्यानंतर बाप्पांच्या मूर्तींचे काय होत असेल, त्याची विल्हेवाट कशी होत असेल याचा आपण एकदा तरी विचार करतो का?
सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये तर गणेशोत्सवाच्या नावाखाली एकमेकांमध्ये स्पर्धा सुरु असते. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या अवाढव्य मूर्तीचे प्रदर्शन करून शेवटी अनंत चतुर्थीला ढोल ताशांच्या गजरात मोठमोठ्या मिरवणुका काढून बाप्पांचे विसर्जन केले जाते.इतकेच नव्हे तर काही घरांतील लोक सुद्धा बाप्पांचे विसर्जन असेच करतात. आणि दुसऱ्या दिवशी त्याच मुर्त्या एक भल्या मोठ्या यंत्राद्वारे कचरा म्हणून नदी - समुद्रातून बाहेर काढल्या जातात. पायाखाली तुडवल्या जातात. हीच का आपली बाप्पावरची श्रद्धा?
बाप्पाच्या मूर्तींचे अशाप्रकारे विसर्जन करून आपण आपली देवावरची श्रद्धा खोटी ठरवत आहोतच . एवढेच नव्हे तर असं करून आपण पर्यावरणाचे शत्रू बनलो आहोत. मूर्तींचे विघटन न झाल्यामुळे नद्या तुंबून राहतात. त्यामुळेच अतिवृष्टीमुळे महापूर येतो. पर्यावरणाचा समतोल बिघडतो. या सगळ्याला फक्त मानवच जबाबदार आहे. आपल्याला हे सगळं बदलण्याची आवश्यकता आहे.
पर्यावरणाची काळजी घेणे हे प्रत्येक माणसाचे कर्तव्य आहे. त्यामुळे प्रत्येकाला स्वतःपासून बदल घडवण्याची सुरुवात करणे गरजेचे आहे. प्रत्येकाने मातीची मूर्ती विकत घेतली पाहिजे. माणसाने किंमत देवाची न करता कलेची करायला हवी आहे.आपण बाप्पांची मूर्ती प्रदर्शनासाठी नव्हे स्वतःच्या श्रद्धेसाठी आणायला हवी आहे. लक्षात ठेवा हा सुंदर निसर्ग देवाने निर्माण केला आहे. देवाला बनवताना, त्याची पूजा अर्चना करताना आपण जर निसर्गाची अवहेलना केली तर ती एक प्रकारची देवाची अवहेलना आहे.
सध्या जगभरात कोरोना महामारी सुरु आहे . या रोगाने जगभरात मृत्यूचे तांडव सुरु आहे. सगळ्यांनी सुरक्षित अंतर ठेवून स्वतःची आणि दुसऱ्याची काळजी घेणे आवश्यक आहे. खरंतर हीच एक योग्य संधी आहे . आपण एक नवीन बदल घडवू शकतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारच्या वतीने गणेश विसर्जनाचे एक अनोखे स्वरूप पाहायला मिळणार आहे. यंदा गणेशोत्सव सामाजिक अंतर राखून साजरा करणे आवश्यक असल्याने शासनाने दिलेल्या निर्देशानुसार मिरवणूक काढता येणार नाही. त्यामुळे उपाययोजना म्हणून शक्य असल्यास नागरिकांनी गृहनिर्माण सोसायटीच्या आवारात गणेशमूर्ती विसर्जनार्ची व्यवस्था करणे गरजेचे आहे किंवा स्वतःच्या घरात विसर्जन करायला हवे.
कोणत्याही प्रकारची मिरवणूक न काढता सामाजिक अंतर ठेवून गणेशोत्सव साजरा करण्यासाठी तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने पाण्याचे स्रोत प्रदूषित होऊ नयेत आणि विसर्जनस्थळी गर्दी होऊ नये म्हणून जास्तीत जास्त नागरिकांनी कृत्रिम तलावांचा उपयोग करायला हवा. आपली देवावरची श्रद्धा अशाने नक्की टिकून राहील आणि पर्यावरणाचा ऱ्हासही होणार नाही.
चला तर मग, आपण सारे जण मिळून या नवीन उपक्रमात सहभागी होऊया ! आपल्या लाडक्या बाप्पाचे विसर्जन अगदी मनोभावे आणि योग्य पद्धतीने करूया. एक सुंदर विश्व पुन्हा निर्माण करूया. आणि पुढच्या वर्षी पुन्हा नव्याने गणपती बाप्पाचे स्वागत करूया…
'गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या'
7 comments
Priyanka tu ganpati visarjanasandarbhat mandlele mat khup sundar mandle ahes ...great
Priyank tu ganpati visarjanasandrbhat mandlele mat khup sundar ahe.. Great
नमस्कार सर ! तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या वेबसाईट वरील कविता वाचल्या आणि तुमच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल सर्वप्रथम तुमचे मनःपूर्वक धन्यवाद .
Mst
Akdam maast priyanka. Awdla vachun.
मनःपूर्वक धन्यवाद
नमस्कार सर ! तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या वेबसाईट वरील essay and poems वाचल्या आणि तुमच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल सर्वप्रथम तुमचे मनःपूर्वक धन्यवाद .
Post a Comment