Best Marathi Poem on Love, Mind Game (Manacha Khel) Marathi Poetry | मराठी मनाचा खेळ कविता

 


 Knowing the mind is the feeling of love ... !! In below you get an amazing Marathi poems on love, Mind Game (Manacha Khel) Love Poetry for your loved once. I hope you like our Marathi poem and share with your friends. या कवितेत मी मनातील निरागस भावनांचे खेळ मांडले आहेत. आशा आहे तुम्हा सगळ्यांना नक्की आवडेल. 


मनाचा खेळ -   Marathi Mind Game Poem on Love | प्रेम कविता


किती हा मनाचा निरागस खेळ 
दिवसरात्र विचार मनी तुझाच असतो 
सांगायचं असतं बरंच काही 
पण तुझ्यासमोर नेहमीच खेळ अपुरा राहतो 

तू सोबत नसताना हे वेडे मन 
तासंतास तुझ्या फोटोशी बोलत राहते 
अन् तुझ्या समोर का - कोण जाणे
नेहमीच असे निःशब्द होते

असे हे चंचल मन माझे 
तू समोर नसताना फार खट्याळ होते 
अन् तुला पाहताच क्षणी 
सारे काही स्तब्ध होते

काय जादू ही तुझ्या प्रेमाची 
सदैव मनाला तुझाच ध्यास असतो 
वाटा वेगळ्या असूनही आपल्या 
स्वप्नांतही तूच भासतो

वाटा वेगळ्या असूनही आपल्या 
स्वप्नांतही तूच भासतो

- प्रियांका कुंभार 




Poem Written by Priyanka Kumbhar



No comments