Best Inspirational Poem on Life in Marathi, Abol Othannahi Kadhi Marathi Life Poetry | अबोल ओठांनाही कधी मराठी जीवन कविता
Life is precious so we have to make it happy. I hope you like our Inspirational Marathi Poems on Life and share with your friends. या कवितांमध्ये मी आयुष्यात आलेले अनुभव मोजक्याच शब्दांत मांडण्याचा प्रयत्न केला आहे.आशा आहे तुम्हा सगळ्यांना नक्की आवडेल…
अबोल ओठांनाही कधी - Marathi Poem on Life | मराठी जीवन कविता
अबोल ओठांनाही कधी
बोलावेसे वाटते
मनातील दुःखांना
व्यक्त करायचे असते
दाटलेल्या भावनांना
अलगद गोंजारायचे असते
अन् निःशब्द मनाला
बोलकं करायचे असते
व्यथा व्यक्त करताना
दुःखांना हलकेच कुरवाळायचे असते
अश्रूंना वाट देऊन
घडलेलं सारं विसरायचे असते
भूतकाळ मागे सोडून
स्वतःला सावरायचे असते
अन् स्वप्नांना सोबत घेऊन
सतत पुढे जायचे असते
अन् स्वप्नांना सोबत घेऊन
सतत पुढे जायचे असते
- प्रियांका कुंभार
Poem Written by Priyanka Kumbhar
No comments
Post a Comment