Best Marathi Love Poem on Dreams | Lapandav Swapanancha Marathi Love Poetry | लपंडाव स्वप्नांचा मराठी प्रेम कविता


Dreaming about love is a representation of your influence towards the people that surrounds you. It signifies that you care about someone or something about that person. Is is a great feeling that you are experiencing a different level of happiness.  In below you get an amazing Marathi poems on love, Lapandav Swapanancha Marathi Love Poetry for your loved once. I hope you like our Marathi poem and share with your friends. लपंडाव स्वप्नांचा या कवितेत मी माझ्या स्वप्नांतील प्रेमाचे वर्णन केले आहे. आशा आहे तुम्हा सगळ्यांना नक्की आवडेल.

लपंडाव स्वप्नांचा - Best Love Poem in Marathi | मराठी प्रेम कविता


लपंडाव स्वप्नांचा 
असाच रोज चालावा 
तुझे स्वप्न पाहता पाहता
जीव त्यात गुंतावा 

मग मी तुला शोधावे 
अन् हळूच तू दिसावे
मला पाहताच क्षणी 
तू पुन्हा स्वतःस लपवावे 

तुला न पाहिल्याचा 
मी करी जरा दिखावा 
मला व्याकुळ बघुनी 
तू मनोमनी हसावा 

मग वेळ अशी सरल्यास 
तुझे तुलाच कळावे 
माझा बहाणा कळताच 
तू माझ्यावर रुसावे 

हा खेळ तुझ्याचसाठी 
हे नकळत तुला उमजावे 
मग समोर येऊनि माझ्या 
तू मिठीत मजला घ्यावे 

मग समोर येऊनि माझ्या 
तू मिठीत मजला घ्यावे

- प्रियांका कुंभार 



Poem Written by Priyanka Kumbhar

1 comment

HARSH ANDHARE said...

तुम्ही हे पण वाचू शकतात Bayko Status आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता हे तुम्हाला कामाला येऊ शकत