Best Marathi Comedy Poem on Relation, Comedy Poems in Marathi | मराठी हास्यकविता


Relation is connection between two person by blood or marriage. Friendship is also a relation between people who like each other and enjoy each other's company. A relationship is a close connection between two people is known as Love relationship. In below you get an amazing Marathi Comedy Poem on Relation for your loved once. I hope you like our Best Marathi Comedy Poem on Relation and share with your friends. प्रेम ही एक भावना आहे. या कवितांमध्ये मी नात्यांतील प्रेमाच्या भावना मोजक्याच शब्दांत मांडण्याचा प्रयत्न केला आहे.आशा आहे तुम्हा सगळ्यांना नक्की आवडेल…


प्रण - Marathi Comedy Poem on Relation | मराठी हास्यकविता


सकाळी एकदा त्याला
प्रेयसीचा फोन आला
म्हणाली,"महत्वाचं बोलायचं,
भेटायचं आहे तुला "

तडक बाईक काढून तो
तिथे जायला निघाला
अन् हिला नेमके काय झाले
याचा विचार करू लागला

बाईक चालवत असताना
त्याची दुसऱ्याशी झाली टक्कर
तो हवालदार आहे समजल्यावर
त्याला यायला लागली चक्कर

तो म्हणाला " साहेब प्रेयसी
माझी बसली आहे रुसून
त्याच काळजीमध्ये माझी
गाडी तुमच्या गाडीला गेली घासून"

हवालदाराने मग त्याला असे
काही खडे शब्द वापरले
अन् हातही न लावता
त्याच्या थोबाडीत मारले

तिथे पोहचल्यावर तो बाईक
थांबवून तिची वाट पाहू लागला
तिच्या आठवणीत मग
कुठेतरी हरवून गेला

एवढ्यात तिच्या येण्याने
त्याचा प्रवास अखेर खुंटला
ती म्हणाली " तुझा नि माझा
आता कायमचा संबंध तुटला

माझ्या वडिलांनी माझं लग्न
दुसऱ्या मुलाबरोबर ठरवलंय
मुलगा थोडा टक्कल आहे
पण त्याने चांगलंच कमवलंय "

तो म्हणाला " तुझ्याशिवाय
आता जगणे कठीण आहे माझे
तुला महागड्या भेटवस्तू दिल्या
हेच आहे उदाहरण ताजे "

ती म्हणाली " किती झाला
तुझा हा टाईमपास
तुही कामधंदा बघ
पुरे झाला हा त्रास"

त्या दिवशी त्याने तिला
बाईकवरून खूप फिरवली
घरी येऊन अधिरासारखी
मग त्याने दारू जिरवली

तिच्या आठवणी आता
तो मनात भरू लागला
नंतर बाईकमध्ये पेट्रोल
भरण्याचा विचार करू लागला

दोन दिवसांनी त्याला
एक जुनी मैत्रीण भेटली
पहिल्यापेक्षा त्याला ती
आता खूपच सुंदर वाटली

त्याने तिला विचारलं " ओळखलं का मला ?"
ती म्हणाली " शाळेतला तू आठवतंय मला "
त्याने धीर करून विचारले तिला ,
"कोणी बॉयफ्रेंड आहे का गं तुला ?"

त्याच्याकडे पाहून ती हळूच
गालात हसून म्हणाली "बॅडलक आहे तुझा,
काळ संध्याकाळी चार वाजता
साखरपुडा झाला माझा "

त्याने आता ठरवलंय
पुन्हा प्रेम करायचं नाही
तुटलेलं मन आता पुन्हा
कधीच तोडायचे नाही

काही दिवसांनी समजलं
त्याचा पुन्हा जोडलं गेलयं मन
तो एका मुलीबरोबर फिरतोय
त्याने कधीच तोडलंय प्रण...






Poem Written by Keshav Kumbhar





2 comments

Swapnil dattatraya mandlekar said...

Nice poem it is!! Funny bt u give nice msg frm this... 😊😊🙌

QualityQuotes said...

Thank You! Hope you enjoyed it :)