Best Happy Shree Ganesh Chaturthi Quotes in Marathi, Status, Wishes, Message, SMS, Shayari, Images | मराठी श्री गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा संदेश



Happy Shree Ganesh Chaturthi to everyone !!! Ganesh Chaturthi celebrates as the birth of Lord Ganesha and is considered most important day to worship him. In below you get an amazing Happy Shree Ganesh Chaturthi Quotes in Marathi, Status, Shayari and SMS for your loved once. I hope you like our Happy Shree Ganesh Chaturthi Quotes in Marathi, Status, Shayari and SMS and share with your friends. गणेशोत्सव मुख्यतः महाराष्ट्रात साजरा केला जाणारा मोठा उत्सव आहे. आजही हिंदु बांधव मोठया आनंदाने, उत्साहाने आणि चैतन्याने घराघरांत गणेशोत्सव साजरा करतांना आपल्याला पहायला मिळतात. श्री गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा संदेश या पोस्टमध्ये मी आपल्या लाडक्या गणरायाचे स्वागत शब्दसुमनांनी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आशा आहे तुम्हा सगळ्यांना नक्की आवडेल…




गणेशोत्सव - Marathi Quotes on Shree Ganesh Chaturthi | मराठी श्री गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा संदेश




बाप्पा आले आनंद घेऊन
सर्व दुखांस लावले दूर पळून
सर्व गणेश भक्तांना गणेश
चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!





श्री गणेश सदैव आपले मार्गदर्शन करो
नेहमीच संरक्षण देवो आणि तुमच्या
आयुष्यातील सारे अडथळे दूर करो .
आपणास व आपल्या परिवारास
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!




गणपती बाप्पाची कृपा तुमच्या
आयुष्यात चांगले ज्ञान मिळवून देवो
आणि तुम्हाला नेहमी भरपूर आशीर्वाद देवो.
विनायक चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.





भक्तिभावाने साजरा करूया
गणेशोत्सव गणपती बाप्पाचा
संदेश देऊया आज जगताला
प्रेम आणि प्रामाणिकपणाचा
श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.





आजचा दिवस होता ज्या दिवशी
भगवान गणेश पृथ्वीवर अवतरले
आणि प्रेमाने वाईटाचा नाश केला.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!





तू सुखकर्ता , तू दुःखहर्ता, तूच मंगलकारी
प्रत्येकाच्या जीवनात उत्साह आणी
आम्हा सर्वांसी आपत्तींपासून वाचवी
आणि सर्व वाईट गोष्टींपासून दूर ठेवी
गणपती बाप्पा मोरया | मंगल मूर्ती मोरया ||




मनापासून जे काही मागितले
बाप्पा सदैव तूचि दिधलें
जो येई तुझ्या चरणांशी त्यांसी
रिक्तह स्त ना धाडले कधी
सदैव कृपादृष्टी राहूदे अशी
गणपती बाप्पा मोरया | मंगल मूर्ती मोरया ||





चला सारेजण आनंदी होऊया
बाप्पाचे नाव घेऊनी चांगल्या
कामास शुभारंभ करूया
आनंद देऊनी चोहीकडे
बाप्पाचा जन्मोत्सव साजरा करूया

गणपती बाप्पा मोरया | मंगल मूर्ती मोरया ||




गजवदना तू गौरीनंदना
शिवपुत्र तू विनायका
कृपाळू तू दीनदयाळा
वंदितो तुजला श्रीगजानना






आज चतुर्थी लाडक्या बाप्पाची
जुडी वाहिली पुष्प दुर्वांकुरांची
गोड मोदकांची आरास रचली
मनी ध्यायिली मूर्ती मोरयाची






ढोल ताशांचा नाद गरजला त्रिभुवनी
रंग गुलाली पसरला दश दिशातुनी
हार केला दूर्वा,जास्वंदांच्या फुलांनी
नैवेद्याचा ताट सजविला उकडीच्या मोदकांनी
गणरायाचे स्वागत करूया पुष्पसुमनांनी




All Quotes written by Priyanka Kumbhar



2 comments

Chandrakant said...

Wow mst

Quality Quotes said...

मनःपूर्वक धन्यवाद