Best Poem on My Home in Marathi, Marathi Poetry | मराठी माझे घर कविता


Home is an enjoyable, happy place where you can live, laugh and learn with your loved once. In below you get an amazing Poem on My Home in Marathi, My Home Poetry for your loved once. I hope you like our Poem on My Home in Marathi, My Home Poetry and share with your friends. घरासोबत आपल्या खूप वर्षांपासूनच्या आठवणी जोडल्या गेलेल्या असतात . घरासोबत आपले एक अनोखे नाते असते. या कवितामध्ये मी माझे घर कसे आहे हे मोजक्याच शब्दांत मांडण्याचा प्रयत्न केला आहे.आशा आहे तुम्हा सगळ्यांना नक्की आवडेल…


माझे घर - Marathi Poem on My Home | मराठी माझे घर कविता


सकाळी पहाटेला माझं
घर माझ्याशी बोलका होतो
जुन्या आठवणींचं माझ्यासमोर
सारे दुःख मांडतो

तो बोलत असताना शब्दांची
कधीच रास होत नाही
तो कितीही बोलला तरी मला
कधीच त्रास होत नाही

माझ्या वडिलांची सुख-दुःखे
या घराने पहिली होती
त्यांच्या ठायी या घराने
आपली निष्ठा वाहिली होती

संध्याकाळी तो माझ्यासारखा
अगदी उदास बसायचा
माझं दुःख ओळखण्याचा
त्याचा कटोकाट प्रयास असायचा

त्याचे माझे नाते
जरा विचित्र आहे
माझ्या आयुष्यातील नाटकात
तो अविभाज्य भाग आहे

सकाळी पहाटेला माझं
घर माझ्याशी बोलका होतो
घरातील प्रत्येक कोन्यात
मला सारं जुनं आठवतं

- केशव कुंभार




 
Written by Keshav Kumbhar

4 comments

Unknown said...

Sir khup chhan kavita vatli great

Quality Quotes said...

नमस्कार सर ! तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या वेबसाईट वरील कविता वाचल्या आणि तुमच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल सर्वप्रथम तुमचे मनःपूर्वक धन्यवाद .

Chandrakant said...

Khup chhan

Quality Quotes said...

मनःपूर्वक धन्यवाद